Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

SRA मार्फत नागरिकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळवून देणे हे माझे कर्तव्य __ गुरुबक्ष पहलानी

बौद्ध नगरमध्ये जितू गुरुबक्ष पहलानी यांनी आयोजित केलेल्या संवाद सभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद 

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक १५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक पूर्व तयारीला जसे प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे, त्याहीपेक्षा वेगाने शहरातील इच्छुक उमेदवारांचे कार्य सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेल्या प्रभाग क्रमांक १९ मधून जितू गुरुबक्ष पाहलानी यांची जोरात तयारी सुरू असून, बौद्ध नगर, भाटनगर परिसरात पूर्वी त्यांचे वडील गुरुबक्ष पाहलानी यांनी या प्रभागाचे नेतृत्व करून नागरिकांची सेवा केली होती. वडिलाप्रमाणे जनसेवाचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रभागातील माता भगिनी आणि सामान्य नागरिकांसह युवकांचा वाढता पाठिंबा त्यांना परिसरात मिळत असल्याचे चित्र आज दिसले. विविध बचत गटांच्या महिला व सामान्य मतदार भगिनी या जितू गुरुबक्ष पहलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. यावेळी माता भगिनींनी जितू गुरुबक्ष पाहलानी यांचे व त्यांच्या मातोश्रींचे औक्षण केले. यावेळी सचिन साबळे यांच्यासह जितू पहलानी यांच्यावर प्रेमे करणारे कार्यकर्ते व मित्रपरिवार मागील आठवड्यात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थितीत होता. यावेळी उपस्थित महिलांना विजेचे led बल्ब भावाकडून भगिनींना भेट देऊन जितू गुरुबक्ष पहलानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की जितू चे वडील गुरुबक्ष पहलानी यांनी पूर्वी लोकप्रतिनिधी असताना येथील समाज बांधवांना मदत केली. गोर गरीब लोकांच्या घरातील मुली बाळींच्या लग्नात आर्थिक सहकार्य केले. आता त्यांचे चिरंजी जितू पहलानी हे उमेदवार म्हणून उभे राहण्याची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना आपण पाठिंबा देऊ असे मनोगत व्यक्त केले. दरम्यान हिवाळ्याच्या थंडीमध्ये प्रभागातील नागरिकांना उबदार वस्त्र मिळवते त्यांची थंडीपासून सुरक्षा व्हावी म्हणून नागरिकांना ब्लँकेट वाटप देखील करण्यात आले. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गज नेते मंडळींपैकी नेते डब्बू आसवाणी, राष्ट्रवादीचे (AP) शहराध्यक्ष योगेश बहल, तसेच नाना काटे यांनी जितू गुरुबक्ष पहलानी यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. SRA मार्फत नागरिकांनी उत्तम गुणवत्तेची घरे मिळवून देणे हे माझे कर्तव्य असल्याची भावना गुरुबक्ष पहलानी यांनी बोलून दाखवली.

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

१५ जानेवारीला मतदान आजपासून आचारसंहिता लागू___ निवडणूक आयोग

२९ महानगरपालिकेच्या निवडणुका मतदान येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार 

| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक १५ : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निवडणूक कार्यक्रमांच्या तारखा जाहीर झाल्या असून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला मतमोजणी होईल. संबंधित महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमांच्या तारखा लक्षात घेता आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २९० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करून पुरेसे सहाय्यक अधिकारी आणि पुरेसे कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक २०२६ निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे:

२९० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच सहाय्यक अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. मतदान दिनांकाच्या ४८ तास अगोदर प्रचाराला निर्बंध लावण्यात आले. आचार संहिता कालावधीमध्ये प्रसार माध्यमांवर देखील नियंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केल्याचे सांगण्यात आले.

महानगरपालिका  २९
जागा २८६९
महिला १४४२
*खर्च मर्यादा 
अ वर्ग: १५ लाख 
ब वर्ग: १३ लाख 
क वर्ग: ११ लाख 
ड वर्ग: १० लाख 
आजपासून आचार संहिता लागू, म्हणजेच आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली आहे.

: निवडणूक कार्यक्रम, निवडणूक प्रक्रिया कालावधी :
 
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : २३ ते ३० डिसेंबर २०२५  
छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघारी घेणे : २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप व अंतिम यादी : ३ जानेवारी 
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६

२० डिसेंबरला अंतिम मतदान यादी जाहीर होईल.
२७ डिसेंबर रोजी मतदार प्रभागाप्रमाणे मतदार यादी जाहीर होईल.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर___आमदार, शंकर जगताप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक १५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टीविरहित शहर असावे, यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेतील डूडूळगाव येथील व आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या ७५५ सदनिकांचे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संगणकीय सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सोडतीमध्ये विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगर सदस्य सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार श्री. जगताप पुढे म्हणाले, 'पिंपरी चिंचवड शहर हे देशात सातव्या व राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून नावारूपास आले आहे. या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करीत आहे. सदर सोडत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. आजच्या सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. तर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० साठी अर्ज करावा" 
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार उपायुक्त बोदडे यांनी मानले.
"पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे"
— अण्णा बोदडे (उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका)

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

लकी ताईने जिंकली ऍक्टिव्हा आणि मानाच्या पैठणीसह विविध बक्षिसे जिंकून विजेत्या ठरलेल्या भगिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद प्रभागात कायम ठेवणार!__सौ. मनिषाताई प्रमोद पवार

मनिषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद! हजारो महिलांनी घेतला खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टरचा आनंद

पाच हजारांपेक्षा जास्त गर्दी खेचणारा "मनिषाताई प्रमोद पवार" आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम थेरगावमध्ये ठरला अव्वल!

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक १४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर थेरगावमध्ये इच्छुक उमेदवारांच्या आयोजित सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असून काल दिनांक १३ डिसेंबर रोजी जगताप नगर येथील सौ. मनिषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थित राहून हजारो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. पाच हजारांपेक्षा जास्त गर्दी खेचणारा हा कार्यक्रम थेरगावमध्ये अव्वल ठरल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला थेरगामधील विविध सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सिने दिग्दर्शक अभिनेते जितेंद्र वाईकर यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली. ऍक्टिव्हा ६जी सह आणि इतर लकी ड्रॉ सह टीव्ही, फ्रीज सह इतर नऊ प्रकाराचे विजेत्यांना बक्षिसे देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

सौ. मनिषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या खेळातील विजेत्यांची व लकी ठरलेल्या महिला भगिनींची नावे पुढीलप्रमाणे : 
१. सुप्रियाताई चोरगे (प्रथम क्रमांकसाठी विजेते बक्षीस ४३ इंची टीव्ही आणि मानाची पैठणी)
२. कोमलताई रुपटक्के (द्वितीय क्रमांक विजेते बक्षीसपिठाची गिरणी आणि मानाची पैठणी) 
३. शारदाताई विजय राऊत (तृतीय क्रमांक विजेते बक्षीस शिलाई मशीन आणि मानाची पैठणी) 
४. तनुप्रिया सिद्धेश्वर लुटे (चौथा क्रमांक विजेते बक्षीस सायकल आणि मानाची पैठणी) 
५. अनिता सुनील थोरात (पाचवा क्रमांक विजेते बक्षीस वॉटर प्युरिफायर आणि मानाची पैठणी)
६. श्रीदेवीताई गणेश अर्जुने (सहावा क्रमांक विजेते बक्षीस कूलर आणि मानाची पैठणी)
७. सुप्रियाताई मोरे (सातवा क्रमांक विजेते बक्षीस मिक्सर आणि मानाची पैठणी)

लकी ड्रॉ विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : 
१. कोमलताई दत्ता खुळे (ऍक्टिव्हा ६जी)
२. रुपालीताई विजय बारवकर (मिक्सर)
३. कु. कल्पनाताई काटे (पंखा)
४. सौ. पूनम प्रवीण शेलार (इस्त्री)

लकी ड्रॉ विजेती ठरून ऍक्टिव्हा ६जी ही दुचाकी जिंकणारी कोमलताई दत्ता खुळे आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणते " मला खूप आनंद झाला. मला खरच गाडीची गरज होती. मला लकी ड्रॉ मध्ये मिळालेली गाडी आता कॉलेजमध्ये जाण्यासाठी उपयोगात येईल. सौ. मनिषाताई प्रमोद पवार हे नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन नागरिकांना मदत करीत असतात"

होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा खेळ खेळून बक्षिसे मिळवून विजेत्या महिला भानिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तोच अनंत प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर कायम टिकविण्यासाठी आणि प्रभाग क्रमांत २३ चा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा भावना व्यक्त करून माजी नगरसेविका सौ. मनिषाताई प्रमोद पवार पुढे म्हणाल्या " नागरिकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मी भारावून गेले. होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ खेळण्यासाठी प्रभाग क्रमांक २३ मधील महिला इथे येऊन उत्तम खेळ खेळल्या. तसेच एवढी मोठी गर्दी आणि त्याचे मॅनेजमेंट करण्यासाठी मला मदतीला आलेल्या प्रभागातील महिला आणि आमची संपूर्ण टीम तसेच थेरगाव मधील विविध सामाजिक व राजकीय इथे उपस्थित राहून पाठिंबा दिल्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार"

यावेळी चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध निवेदक जितेंद्र वाईकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या " होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा खेळ अनेक ठिकाणी हजारो प्रयोग केले पण, थेरगावमध्ये जमलेली एवढी गर्दी मी कधीच इतर कुठल्याच पैठणीच्या खेळाच्या कार्यक्रमात पाहिली नाही. उत्तम नियोजन आणि पारदर्शक कार्य हे मनिषाताई यांच्या कार्याची स्टाईल आज अनुभवायला मिळाली"

माजी नगरसेविका सौ. मनिषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमा दरम्यान थेरगावमधील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभेचे काळुरामशेठ बारणे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते तानाजीभाऊ बारणे, सनी बारणे, करिश्माताई बारणे, रवी भिलारे, नम्रताताई भिलारे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, सोनालीताई गाडे, विशाल बारणे, विशाल पवार, मयूर पवार, संभाजी बारणे, सागर बारणे, शाकिरभाई शेख, इनुस पठाण यांच्यासह देवमाणे ताई, मंजूताई गुप्ता, रेणुकाताई हेगडे, रितूताई कांबळे, सपनाताई पवार, सोमनाथ नाढे, यांच्या सह विनोद पवार, प्रमोद पवार आणि श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!

प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच विरोधकांना धाकधुक! नागरिकांनी लावलेले सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स प्रशासनाने काढले की विरोधकांनी?


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ११ : नेहरूनगर खराळवाडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रभावशाली इच्छुक उमेदवार सागर गोपाळ सुर्यवंशी यांना प्रभागातून विविध संस्था संघटना, मित्र परिवार, मित्र मंडळे आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील स्थानिक मित्र आणि कार्यकर्त्यांकडून पत्रकार सागर सूर्यवंशी यांच्या नावाची शिफारस प्रभावीपणे उमेदवार म्हणून केली जात असून परिणामी विरोधकांमध्ये धाकधुक वाढत चालली असून प्रभागातील सागर सूर्यवंशी यांना पाठिंबा असल्याचे फ्लेक्झ बॅनर विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून काढण्याचे कृत्य केल्याची चर्चा प्रभागामध्ये सुरू आहे. 

भाजपचे प्रभावशाली दावेदार उमेदवार म्हणून स्थानिक नागरिकांनी पत्रकार सागर सूर्यवंशी यांचे नाव पुढे केल्यामुळे आणि नागरिकांनीच स्वयंस्पूर्तीने सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स लावल्यामुळे विरोधकांमध्ये धाक धुक वाढली असल्याने असे कृत्य प्रशासनाला तक्रारी करून केले असल्याचा दावा खराळवाडी येथील मित्र मंडळे करीत आहेत. आत्तापासूनच सागर सूर्यवंशी यांना जनतेचे वाढता पाठिंबा मिळत असल्याचा हा परिणाम असून लावलेले फ्लेक्स काढल्याने सागर सूर्यवंशी यांचा प्रभाव कमी होणार नाही असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. सागर सूर्यवंशी यांचे हिंदुत्वाचे कार्य आणि भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या विंग चे कार्य पाहता प्रभाग क्रमांक ९ मधून सागर सूर्यवंशी हेच योग्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू आहे.


बुधवार, १० डिसेंबर, २०२५

पिंपरी चिंचवड शहराला सिंगापूर बनवण्याची योजना___ प्रा. नामदेव जाधव

सुशिक्षित आणि नवीन चेहऱ्यांना तिकिटे देऊन गनिमी काव्याने १०० नगरसेवक निवडून आणणार!__प्रा. नामदेवराव जाधव 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १० : शहराला आपण सिंगापूर सारखे शहर बनवणार असल्याचे सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष प्रा. नामदेव जाधव यांची आज पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत घोषणा केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकी संदर्भात त्यांनी पक्षाची महत्वाची भूमिका यावेळी मांडून उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन पुढील महत्वाचे मुद्दे मांडले.

प्रा. जाधव यांनी सांगितले की, "पिंपरी–चिंचवड शहरातील धुळीचे कण मायक्रो लेव्हलवर अत्यंत वाढले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या प्रदूषणामुळे प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अंदाजे २० वर्षांनी कमी होत आहे, ही चिंताजनक बाब आहे"

"शहरातील नद्यांमध्ये वाढणारे जलपर्णी, तसेच अनेक कंपन्यांकडून नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी ही प्रदूषणाची गंभीर कारणे असून, बिल्डरांच्या बांधकामांमधून निर्माण होणारी प्रचंड धूळ ही परिस्थिती आणखी बिघडवत चालली आहे"तसेच, महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि राजकीय नेते बिल्डरांशी संगनमत करून बसले असल्याने शहरातील आवश्यक सुधारणा होणे कठीण झाले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि विविध समस्येमध्ये जखडलेल्या शहराला बाहेर काढण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्ष पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या एकूण १२८ जागांवर निवडणूक लढविणार असून १०० नगरसेवक निवडून अन्यायाचा निर्धार यावेळी प्रा. नामदेव जाधव यांनी केला.

काही पक्षांचे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षांकडून तिकीट न मिळाल्यास ते आमच्या पक्षातून लढण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आमचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. निवडून आलेला कोणताही उमेदवार भ्रष्टाचारात गुंतला तर त्याचे नगरसेवकपद मी पक्षाध्यक्ष म्हणून तत्काळ रद्द करीन,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. शहरातील नागरिकांना आता तेच-तेच चेहरे आणि तेच-तेच पक्ष नको आहेत. आमचे कार्य नागरिकांपर्यंत व्हिडिओद्वारे स्पष्टपणे पोचत असल्याने त्यांचा विश्वास आणि मतांचा कौल आमच्याकडे वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही पिंपरी–चिंचवडमधील सनय छत्रपती शासन पक्षाची पहिली पत्रकार परिषद असल्याची त्यांनी माहिती दिली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,

राजकारणात घराणेशाही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या पक्षांत जात आहेत. यामुळे नवीन तरुणांना संधी मिळत नाही.

त्याचबरोबर, राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे अल्पशिक्षित आणि गुंड प्रवृत्तीचे लोक निवडून येतात, तर सुशिक्षित मतदार मतदानाला बाहेर पडत नाहीत. यामुळे एकूण मतदान केवळ ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान राहते. या परिस्थितीला बदलण्यासाठी सनय छत्रपती शासन पक्ष सर्वत्र सुशिक्षित आणि उच्चशिक्षित उमेदवारांना तिकीट देणार असल्याचे मनमूद केले. पक्षाने असा निर्णय घेतल्याने जे सुशिक्षित मतदार आजपर्यंत मतदानासाठी बाहेर पडत नव्हते, ते मोठ्या संख्येने मतदानाला येतील, आणि यामुळे घराणेशाही व गुंडगिरी यांना पूर्णविराम मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

इतिहासात पहिल्यांदाच पिंपरी–चिंचवडमध्ये विक्रमी मतदान होईल, आणि या विक्रमी मतदानातून सत्तांतर घडेल, असा विश्वास व्यक्त करून या शहरातील प्रत्येक नागरिकाला आपले शहर सिंगापूरसारखे विकसित व्हावे अशी इच्छा असून, हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता सनय छत्रपती शासन पक्षाच्या दूरदृष्टीतून शक्य आहे ते आपण सद्य करण्याचे नागरिकांना आवाहन केले. सनय छत्रपती शासन पक्षाचा जन्म पिंपरी–चिंचवडमध्येच झाला असून, पक्षाध्यक्ष म्हणून ते स्वतः या शहरात राहत असल्याने शहरातील सर्व समस्यांची त्यांना पूर्ण जाण आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रश्न शंभर टक्के सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास पत्रकार परिषदेत प्रा. नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केला.

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

जनचळवळीचे पितामह भीष्माचार्य डॉ .बाबा आढाव यांचे दुःखद निधन

कष्टकऱ्यांचा मार्गदाता आपल्यातून निघून गेल्याने कामगार वर्गातर्फे दुःखी अंतःकरणाने "बाबांना" भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक ९ : कामगार कष्टकरी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली उभी हयात खर्ची करणारे ज्येष्ठ विचारवंत, समाज अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कामगार चळवळीची मुलुख मैदानी तोफ असे देखील बाबा आढाव यांना संबोधले जायचे. त्याचे कारण म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न आंदोलने उपोषणे मोर्चे काढून सोडविले. हातगाडी पंचायत, रिक्षा पंचायत, विविध कामगार आणि कष्टकरी संघटना, असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटणारे बाबा आढाव अनंतात विलीन झाल्याने कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली असल्याचे बोलले जात आहे.

गोरगरीब, वंचित,असंघटित कामगार, हमाल, रिक्षा चालक-मालक, कामगार,शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत झुंजणारे झुंजार नेते, ज्यांच्या उत्तुंग कार्याकडे पाहुण, प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते घडले. असे ज्येष्ठ समाजसेवक,समाजवादी नेते, जन चळवळीचे पितामहा भीष्माचार्य, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे खरे वारसदार आदरणीय डॉ.बाबा आढाव यांचे दुःखद निधन झाले आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बाबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद होता. आमच्या सर्व आंदोलनाला त्यांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळायचा. त्या बळावर आम्ही लढत होतो. आमच्या मोहननगर मध्ये देखील त्यांचे मार्गदर्शन मिळाले. 
खरोखर आज जनचळवळीचा आधारवड गेला. गोरगरीब वंचित शेतकरी कामगारांचा आवाज शिण झाला. या पुढच्या काळात त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांच्या कुटुंबाला व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य पंढरीच्या परम दयाळू श्री पांडुरंगाने देवो, हीच प्रभू श्री पांडुरंग चरणी मनापासून प्रार्थना. ओम:शांती!शांती!शांती!"____ मारुती भापकर (सामाजिक कार्यकर्ते)

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

एक्टिव्हा सह भरघोस बक्षीसे जिंकण्याची संधी सौ. मनिषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर या पैठणीच्या खेळात!

सौ. मनिषाताई प्रमोद पवार आयोजित भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा येत्या १३ तारखेला थेरगावमध्ये रंगणार!

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ८ : प्रभाग क्रमांक २३ मधील थेरगाव येथील महिला भगिनींसाठी खास भव्य होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम येत्या १३ तारखेला सायंकाळी ५. वाजता संपन्न होणार असून माजी शिक्षण सभापती मा. नगरसेविका सौ. मनिषाताई प्रमोद पवार यांनी आयोजन केले आहे. नवीन थेरगाव हॉस्पिटल समोरील पोलिस स्टेशनच्या बाजूच्या जगताप नगर येथील मैदानात हा भव्य होम मिनिस्टर खेळ संपन्न होईल. लकी ड्रॉ बक्षीस देखील काढले जाणार असून ऍक्टिव्हा स्कूटर हे खास आकर्षक बक्षीस त्यासाठी ठेवले आहे. खेळामध्ये उल्लेखनीय खेळ खेळणाऱ्या आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासह पुढे आठव्या क्रमांकापर्यंत उत्तमोत्तम बक्षिसे असून याचा परिसरातील महिला भगिनींनी खेळ पैठणीचा खेळ खेळून आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी व श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने केले आहे. 

प्रथम क्रमांकसाठी ४३ इंची टीव्ही आणि मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक पिठाची गिरणी आणि मानाची पैठणी, तृतीय क्रमांक शिलाई मशीन आणि मानाची पैठणी, चौथा क्रमांक सायकल आणि मानाची पैठणी, पाचवा क्रमांक वॉटर प्युरिफायर आणि मानाची पैठणी, सहावा क्रमांक कूलर आणि मानाची पैठणी, सातवा क्रमांक मिक्सर आणि मानाची पैठणी आणि आठव्या क्रमांकासाठी टेबल फॅन आणि मानाची पैठणी असे विजेत्यांना बक्षिसे असणार आहेत. याशिवाय खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या खेळात प्रत्येक सहभागी महिला भगिनींना मिळणार आहेत खास आकर्षक बक्षिसे. प्रभाग क्रमांक २३ मधील महिला भगिनींना खेळाच्या माध्यमातून मनोरंजन आणि सामूहिक आनंदोत्सव साजरा करता या उद्देशाने भव्य अशा खेळ रंगला पैठणीचा या खेळाचे आयोजन केल्याचे मुख्य आयोजक मा. नगरसेविका सौ मनिषाताई प्रमोद पवार यांनी सांगून महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येमध्ये सहभागी होऊन उत्तम खेळ खेळून उत्तमोत्तम बक्षिसे जिंकावीत असे आवाहन महिला भगिनींना केले आहे. सिने दिग्दर्शक अभिनेते जितेंद्र वाईकर हे खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या खेळाचे निवेदक असणार आहेत.
अधिक माहितीसाठी आणि फॉर्म भरून घेण्यासाठी संपर्क पुढील क्रमांकावर संपर्क करून 96731 28282 / 9011161467 कार्यालय : सौ. मनिषाताई प्रमोद पवार जनसंपर्क कार्यालय, शिवशक्ती गणेश मंदिरासमोर, पडवळ नगर, थेरगाव - ४११०३३


प्रभाग क्रमांक २२ मधून सौ.मोनिका नवनाथ नढे निवडणुकीच्या रिंगणात

नवीन सुरुवात प्रभागातील विकासाची दिशा बदलणार 

| सांगावा न्यूज | काळेवाडी,  दिनांक ८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या संपूर्ण परिसरात आणि प्रभागात इच्छुक उमेदवार यांची सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. 
त्यामुळे स्थानिक नागरिक कोणाला संधी देणार हे स्पष्ट होत असल्याचे दिसून येईल.
प्रभाग क्रमांक २२ मधून सामाजिक कार्यकर्त्या, जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा सौ.मोनिका नवनाथ नढे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. 
प्रभागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या दूर केल्या आहेत. प्रभागातील महिलासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना, सामाजिक कार्यक्रम, महिलांसाठी मनोरंजन, खेळ, अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. 
सौ.मोनिका नवनाथ नढे यांनी प्रभागात सामाजिक व धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असतात.त्यांच्या माध्यमातून जयंती उत्सव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, अन्नदान वाटप, महिलांचा सन्मान सोहळा, सण उत्सव, कीर्तन सोहळा, नवरात्र उत्सव आणि अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 
प्रभाग क्रमांक २२ मधील विजयनगर, पवना नगर, आदर्श नगर, नढे नगर ,काळेवाडी येथील नागरिकांनी म्हटले की, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी देणार, प्रभागातील सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व करणारा, परिसरातील विकासकामे करणारा, प्रभागातील समस्या सोडवणारा व त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या ताबडतोब सोडवणारा असा नगरसेवक यावेळी प्रभागातून सर्व जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले जात आहे. 
सो मोनिका नवनाथ नढे यांच्या माध्यमातून प्रभागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये त्यांना प्रभागातील माय माऊली व जनता मोठा मताधिक्याने मतदान करून प्रभागातील सेवा करण्याचे संधी देणार असल्याचे प्रभागांमध्ये नागरिकांकडून म्हटले जात आहे. माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे यांनी प्रभागातील सामाजिक कार्याच्या माध्यमातून विकास कामे व सामाजिक बांधिलकी जपत लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. लोकांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निवारण केले आहे. प्रभागातील असलेला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी आहे, त्याच जनतेच्या विश्वासाने सौ. मोनिका नवनाथ नढे यांना ही जनता मोठ्या प्रमाणात मतदान करून आशीर्वाद देणार आणि प्रभागातील व परिसरातील सेवा करण्याची संधी देणार असल्याचे सांगितले जातेय.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये सौ. मोनिका नवनाथ नढे यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.प्रभागात त्यांचे सामाजिक , आरोग्य,शैक्षणिक व धार्मिक कार्य यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नवनाथ नढे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत असल्याने त्यांचा प्रभागातील व शहरातील  राजकीय नेत्याशी जवळीक आहे. ते विरोधी पक्ष नेते नाना काटे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 मध्ये  सौ.मोनिका नवनाथ नढे यांना प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

प्रथम क्रमांक ५१,१११/- रुपयांच्या रोख पारितोषिकासह भरघोष बक्षिसे जिंकण्याची संधी सौ. रेखाताई नरेंद्र माने आयोजित Reels Stars स्पर्धा २०२५ मध्ये

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ७ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सौ. रेखाताई नरेंद्र माने यांनी रिल्स स्पर्धा आयोजित केली असून याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा सर्व वयोगटसाठी खुली असून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रिल स्टार साठी ५१,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१,१२१ रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ११,१११ रुपयांची रोख पक्षीसे देऊन Reels Stars चा सन्मान केला जाणार आहे. शिवाय स्पेशल पब्लिक चॉईस   पारितोषिक देखील काढले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नसून आपली कला, आत्मविश्वास क्रिएटिव्हिटी दाखवायची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर विषय दिले जातील त्या विषयावर रिल्स बनवायची आहे. 

विषय : डान्स, ॲक्टिंग, डायलॉग, देशभक्ती, संस्कृती, मिमिक्री, मोटिवेशनल, सोशल मेसेज, कॉमेडी, एंटरटेनमेंट असे विषय असून स्वतः चे स्वतः रिल्स बनवून सहभागी होता येईल.

स्पर्धेची सुरुवात ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून १० जानेवारी २०२६ पर्यंत स्पर्धा चालू राहील. १४ जानेवारी रोजी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सदर रिल्स स्पर्धा इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या माध्यमांवर प्रदर्शित होईल.

अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क : सौ. रेखाताई नरेंद्र माने यांचे जनसंपर्क कार्यालय, लेन नंबर १०, अशोका हौसिंग सोसायटी, थेरगाव.

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

गरिबांचे धान्य लुटणारी रेशन दुकानदारांची टोळी उध्वस्त करा!___धनाजी येळकर पाटील

छावाच्या वतीने "मेरा रेशन मेरा अधिकार" जनजागृती मोहीम

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ६ : पिंपरी चिंचवड शहरातील अ व ज या अन्न व पुरवठा विभागाच्या शासन मान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना शासन निर्धारित नियमानुसार प्रत्येक कार्ड ग्राहकाला त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार प्रत्येक व्यक्तीस ५ किलो असे धान्य न देता प्रत्येक वेळी धान्याची कपात करून कमी धान्य दिले जात आहे.अशा बऱ्याच तक्रारी छावा मराठा युवा महासंघाकडे येत आहेत. हे छावा संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना १६ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते.या संदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. गरीब जनतेची लूट चालूच आहे.गरिबांच्या तोंडचा घास काढून हे धान्य काळया बाजारात विकले जात आहे.त्यामुळे संघटनेने आता आक्रमक भूमिका घेत प्रत्येक दुकानावर जाऊन हे प्रकार रोखण्याचे ठरवले आहे.
         इ पॉस मशीन द्वारे बायोमेट्रिक पद्धतीने थंब घेऊन धान्य दिले जाते पण काही मोजके स्वस्त धान्य दुकानदार काही मोजक्याच कार्ड धारकांना थंब घेऊन ई पॉस प्रणालीद्वारा निघणारी पावती देतात बाकी सर्रास दुकानदार ती पावती देत नाहीत. यामुळे कार्ड धारकाला आपले धान्य कमी येऊनही त्यांना जाब विचारता येत नाही,त्याची तक्रार करता येत नाही.
तसेच ग्राहकाने थंब दिल्यानंतर इ पॉस पावतीची मागणी करून सुद्धा त्याला त्याची पावती न देता त्यांचे रेशन बंद करण्याची उद्धटपणे धमकी दुकानदारांकडून दिली जाते.त्यामुळे हे गरीब ग्राहक अधिकाऱ्याकडे तक्रार करीत नाहीत.तर काही दुकानदार आम्हाला पावती न देण्याचा वरून अधिकाऱ्याकडून आदेश असल्याचे उघड सांगत आहेत.त्याचा पुरावा सुद्धा अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.त्यामुळे पुरवठा प्रशासना विरोधात या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी व रोष वाढत आहे.नियमापेक्षा धान्य कमी देणाऱ्या दुकानदारावर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा याला मूक संमती आहे असाच याचा अर्थ होतो.त्यांच्याच आशीर्वादाने ही सामान्य जनतेची लूट चालू आहे.या सर्व प्रकाराची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यता पडताळून पहिलेली आहे. त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.त्यामुळे छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक दुकानावर जाऊन रेशन कार्ड धारकांशी संवाद साधून "मेरा रेशन मेरा अधिकार" हे रेशनकार्ड धारकांसाठी जनजागृती अभियान सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ पासून सर्व रेशन दुकानावर राबवण्यात येणार आहे.ज्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंब आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहणार नाहीत,त्यांच्या अधिकाराची आणि हक्काची माहिती या अभियानाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. तसेच जे रेशन दुकानदारावर शासन नियमात वागणार नाहीत.अशा दुकानदारावर त्यांचे परवाने रद्द करून कायदेशीर कठोर कारवाई करावी अन्यथा छावा स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर म्हणाले.
 अ झोन चे पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर तर ज झोन चे प्रदिप डंगारे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी छावा प्रमुख धनाजी येळकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गुंड, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, पुणे पूर्व चे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कार्यकाळ वर्षपूर्ती निमित्त बातम्यांच्या चित्र प्रदर्शनाचा सोहळा संपन्न

प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षपूर्ती निमित्त स्टेप्स फाउंडेशन आयोजित बातम्या व छायाचित्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद 


लोकशाहीचा चौथा स्तंभ नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर आधारित बातम्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न 

| सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : "आपला आदर्श, आपली प्रेरणा, नवमहाराष्ट्र निर्माण संकल्पना"  या विचारांवर आधारित सर्वस्पर्शी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याच्या , विद्यमान सरकार मधील वर्षपूर्ती निमित्त, "लोकशाहीचा चौथा स्तंभ" असलेल्या नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन चिंचवड येथे दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्रेक्षागृह आर्ट गॅलरी चिंचवड येथे पंकज भोयर ( मंत्री, महाराष्ट्र राज्य), यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, गजानन जोशी (मुख्य संयोजक: देवाभाऊ फांऊडेशन, महाराष्ट्र राज्य), विश्वजीत देशपांडे (प्रदेशाध्यक्ष: परशुराम हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कर्तृत्ववान मुख्यमंत्री, गतिमान शासन व निर्णय अंमलबजावणी झालेल्या या मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळावा हा कार्यक्रम घेण्यापाठीमागे निष्पक्ष हेतू आहे असे मुख्य आयोजक नितीन चिलवंत यांनी सांगून सुरूवातीला मंत्री महोदयांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. निमंत्रक व स्टेप्स फाउंडेशन चे संदेश मुखेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुसज्ज नियोजन केले होते त्याचा दर्शक आणि मान्यवरांनी अनुभव घेतला.

यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "प्रथमच पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशापद्दतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करून ते सर्वासाठी खुले केल्याबद्दल स्टेप्स फाउंडेशनचे आणि संपुर्ण टीमचे कौतुक. असे कार्यक्रम प्रत्येक जिह्यात झाले पाहिजेत जेणेकरून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळेल" 

गोरक्ष लोखंडे (अनुसूचित जाती/जमाती आयोग सदस्य, सचिव दर्जा) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "या चित्र प्रदर्शनातील सर्वात जास्त आवडलेला फोटो म्हणजे, माझ्या राज्यातील गरीब आणि शेवटचे घर जोपर्यंत सुखी नाही ते राज्य सुखी नाही! असा विचार करून रयत सुखी ठेवण्यासाठी कार्य करणारे मराठी मनाचा मानबिंदू या मातीने आम्हाला दिला, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतानाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे चित्र जास्त भावले" 

स्टेप्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षभरातील कार्यकाळातील विकासकामांचा सर्वांगीण आढावा सादर करणाऱ्या विशेष विकास प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि सामन्य नागरिकांनी घेतला. प्रदर्शनामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा, निर्णयांचा आणि जनकल्याणकारी उपक्रमांचा दस्तऐवजी स्वरूपात व्यापक परिचय यामधून दर्शकांना झाला. दर्शकांसाठी हे केवळ चित्र प्रदर्शन नव्हे तर ज्ञानदर्शन होते अशी भावना काही उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. असे हे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी दिवसभर सुरू होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये राज्य मंत्री पंकज भोयर यांच्या सह गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा, सदस्य : अनुसूचित जाती जमाती आयोग), अमेय जोशी, जागृती धर्माधिकारी, निलेश नेवाळे, तुषार हिंगे, दिपाली जोशी, संदीप पोलकम, मुकुंद घोलप, प्रवीण शेलार, संदीप मोरे, अजिंक्य पोतदार, सचिन बंदी (सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर), कैलास कुटे (अध्यक्ष भाजपा पिंपरी विधानसभा), केतकी कुलकर्णी, एम. वेंकटेश, दिनेश यादव, सुप्रिया चांदगुडे, मुक्ता पुंडे, राहुल अग्रवाल, जयदीप खापरे, संदीप थोरात, अरुण पाडुळे, विशाल लोखंडे, काशिनाथ ठाकूर, संदीप चव्हाण, प्रदीप रॉय, रेशु अग्रवाल,भक्ती मुखेडकर, रेश्मा चिलवंत, अश्विन गुडसूरकर, भूषण तरकसे, लिओन कुटीनो, व्यंकटेश सोमवंशी, विजय चव्हाण, भावना नर्सिंगोजू , शिवकुमारसिंह बायस, धनंजय गावडे, सतीश सिल्म, ओंकार शिकारे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन साळी यांनी केले.



प्रभाग क्रमांक २३ मधील विद्यार्थ्यांसाठी बालदिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा

सौ. सोनालीताई संदीप गाडे यांच्या वतीने बालदिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन 

बालदिनानिमित्त थेरगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा

| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ७ : बालदिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो, आपल्या थेरगावमध्ये 

रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी बालदिना निमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक २३ मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रभाग अध्यक्षा सौ. सोनालीताई संदीप गाडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बापूजीबुवा गार्डन, थेरगाव गावठाण येथे सकाळी ८ वाजता भव्य चित्रकला स्पर्धा होणार असून स्पर्धा  इयत्ता २ री ते ५ वी आणि इयत्ता ६ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये होणार आहे.

: चित्रकलेचे विषय पुढीलप्रमाणे : 

* इयत्ता २ री ते ५ वी

१.माझा आवडता प्राणी  

२.माझा आवडता पक्षी 

३.फुगेवाला

* इयत्ता ६ वी ते १० वी

१.माझा आवडता उत्सव 

२.ऑपरेशन सिन्दुर 

३.सैनिकांना राखी बांधणारी बहीण 

४.वृद्धाश्रमाला भेट 

५.गणपती विसर्जन नंतरचा दुसरा दिवस 

६.किल्ले बनवणारे बाल कलाकार.

चित्रकला स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना विशेष बक्षिसे मिळणार आहेत तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहेत, ते पुढीलप्रमाणे 

*प्रथम क्रमांक*

टॅब, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक

*द्वितीय  क्रमांक

सायकल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक

*तृतीय क्रमांक

सायकल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक

विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि या चिमुकल्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रभाग क्रमांक २३ मधील विद्यार्थांसाठी खास आयोजित केलेल्या या स्पर्धेत पालकांना देखील आपल्या मुला मुलींनी रेखाटलेल्या कलाकृतींचा आनंद घेता येणार आहे.

प्रत्येक सहभागी स्पर्धकांनी येतांना सोबत पाण्याची बाटली, रंगकामाचे साहित्य, पेन्सिल, एरेझर, रायटिंग पॅड इत्यादी साहित्य सोबत घेऊन येणे आवश्यक.

सर्वांनी स्पर्धेसाठी वेळेवर हजर रहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी सौ.सोनालीताई संदीप गाडे 

यांच्या संपर्क कार्यालयाला भेट द्यावी.

पत्ता: पवार नगर, कॉलनी क्रमांक १, थेरगाव, पुणे-४११०३३.

संपर्क: ९९२१४७०१०१

फॉलोअर